Maharashtra Talathi Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या पदसंख्येत तब्बल ३ हजार ८८ नवीन पदांची मोठी वाढ केली आहे. आता ही भरती एकूण ५ हजार ७०७ पदांसाठी होणार असून यामध्ये १ हजार ५३९ तलाठी, ४८० लिपिक-टंकलेखक व इतर संवर्गांचा समावेश आहे. यासोबतच अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ऑनलाईन परीक्षा शुल्क ८ ऑगस्टपर्यंत भरता येणार आहे.
MPSC ची तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध

येथे पहा जाहिरात
Maharashtra Talathi Vacancy In MPSC Group C : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो परीक्षार्थी आणि उमेदवारांसाठी एक अत्यंत दिलासादायक व महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ च्या पदसंख्येत मोठी वाढ जाहीर केली असून, यामुळे भरती प्रक्रियेतील एकूण पदांची संख्या आता थेट ५ हजार ७०७ वर पोहोचली आहे. याशिवाय, इच्छूक उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीतून तलाठी पदांचीही भरती केली जाणार आहे.
MPSC Group C Combined Exam Vacancy Increase : पदसंख्येत तब्बल ३ हजार ८८ नवीन पदांची भर
एमपीएससीने २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या मूळ जाहिरात (क्र. ०१७/२०२६) नुसार सुरुवातीला २ हजार ६१९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. मात्र, सामान्य प्रशासन विभागाच्या ५ मे २०२६ च्या शासन निर्णयानुसार आणि विविध शासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या नवीन मागणीपत्रांनुसार, आयोगाने आता अतिरिक्त ३ हजार ८८ पदांचा या परीक्षेत समावेश केला आहे. यामुळे एकूण पदसंख्या २ हजार ६१९ वरून वाढून ५ हजार ७०७ एवढी झाली आहे. ज्या नवीन पदांचा या भरतीत समावेश झाला आहे त्यामध्ये तलाठीचे पदेही आहेत.
MPSC Group C New Posts: समाविष्ट करण्यात आलेली नवीन संवर्ग व पदे:
नवीन शुद्धिपत्रकानुसार विविध विभागांतील खालील महत्त्वाच्या पदांचा या संयुक्त परीक्षेत समावेश करण्यात आला आहे:
१. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (महसूल व वन विभाग): १ हजार ५३९ पदे (अर्हता: कोणत्याही शाखेतील पदवी).
२. वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल (राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व इतर): ११ पदे.
३. सहायक अधीक्षक (कृषि व पदुम विभाग): ११ पदे.
४. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक): २५४ पदे (अर्हता: मत्स्यविज्ञान विषयातील B.F.Sc. पदवी).
५. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय: २३० पदे.
६. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग: १५५ पदे.
७. आदिवासी विकास विभाग: ६९ पदे.
८. लिपिक-टंकलेखक (महसूल व वन विभाग): ४८० पदे.
९. लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग): ३३९ पदे.
MPSC ची तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध

येथे पहा जाहिरात
Talathi Bharti Exam application date: परीक्षेची तारीख व अर्जाचे सुधारित वेळापत्रक
एमपीएससीने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रचलित पद्धतीने (Offline OMR आधारित) घेतली जाईल. वाढलेल्या पदांमुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे:
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: ०५ ऑगस्ट २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत).
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: ०८ ऑगस्ट २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत).
MPSC ची तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध
येथे पहा जाहिरात
MPSC Group C Bharti 2026 Important Instructions: उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आणि चलनाचा नियम
आयोगाने उमेदवारांना विशेष आवाहन केले आहे की, पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी विविध विभागांचे सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय अतिरिक्त तक्ते प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने पदसंख्या कमी आहे किंवा विशिष्ट संवर्गाचा समावेश नाही, असे समजून अर्ज भरण्याचे टाळू नये. अर्ज न भरल्यामुळे निवडीची संधी हुकल्यास नंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
Maharashtra Talathi Bharti link: अर्जाची लिंक
तसेच, परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी ऑफलाईन चलनाची सवलत पूर्णपणे बंद करण्यात आली असून, उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे) शुल्क भरावे लागेल. या भरतीमुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांना शासकीय सेवेत रुजू होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.